कविता
१. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।
भक्ताचिया काजा पावत असे ॥१॥
पावत असे महासंकटी निर्वाणी ।
रामनाम वाणी उच्चारीत ॥२॥
उच्चारीता राम होय पाप चर ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतांसी आठवे ।
पापीयानाठवे कांही केल्या ॥४॥
कांही केल्या तुझे मन पालटेना ।
दास म्हणे जन सावधान ॥५॥
मूळ रचना - समर्थ रामदास
संगीत - राम फाटक
स्वर - पं. भीमसेन जोशी