Saturday, December 12, 2015

कविता


१. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा




आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । 
भक्ताचिया काजा पावत असे ॥१॥ 
पावत असे महासंकटी निर्वाणी । 
रामनाम वाणी उच्चारीत ॥२॥ 
उच्चारीता  राम होय पाप चर । 
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥

पुण्यभूमी पुण्यवंतांसी  आठवे । 
पापीयानाठवे कांही केल्या ॥४॥ 

कांही केल्या तुझे मन पालटेना । 
दास म्हणे जन सावधान ॥५॥ 

मूळ रचना - समर्थ रामदास 




संगीत - राम फाटक 
स्वर - पं. भीमसेन जोशी

No comments:

Post a Comment